• Tue. Jan 7th, 2025

    ‘महारेरा’ कायद्यामुळे ग्राहकांना स्वरक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 5, 2025
    ‘महारेरा’ कायद्यामुळे ग्राहकांना स्वरक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद




    नागूपर दि. ०५ : गृहनिर्माण क्षेत्रातील विकासकांना महारेरा कायद्याअंतर्गत प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आल्यामुळे ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे, विकासकांनीही सर्वसामान्य जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    चिटणवीस सेंटर येथे ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो’ चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास एक्सपोचे अध्यक्ष घनशाम ढोकणे, सचिन  मेहेर, राहूल बोंद्रे, कुणाल पढोळे, अजय बोरकर, अजय केसरे, संजय महाजन उपस्थित होते.

    एकाच छताखाली बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांनी विविध गृहनिर्माण व भूखंड या बद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की यापूर्वी अनधिकृत भूखंड खेरदीचे प्रकार होत होते पंरतु, अधिकृतपणे खरेदी करणे यामुळे सोयीचे होणार आहे. अशा प्रकारचे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

    या एक्सपोमध्ये 65 हून अधिक बिल्डर व 350 हून अधिक डेव्हलपर्स यांनी सहभाग घेतला आहे. नागपूर शहरातील नागरिकांना त्यांच्या मागणीप्रमाणे पूर्व प्रकल्पामध्ये नोंदणी करणे सुलभ होणार आहे.

    या वेळी मुख्यमंत्र्यांनी होमेथॉन -2 या प्रॉपटी एक्सपोतील विविध दालनांना भेट देऊन विकासकांच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed