Uttan To Virar Sea Link : MMRDA ने नव्या लिंकची योजना आखली असून उत्तन ते विरारपर्यंत ५५ किमी लांबाचा लिंक रोड तयार केला जाणार आहे. या लिंक रोडमुळे वर्सोवा ते विरार हे अंतर केवळ ४५ मिनिटांत पार करता येणार आहे.
एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५५ किमी लांबीच्या नव्या रोडचा संपूर्ण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तयार करण्यात आला आहे. सध्या या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. याचं काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रोजेक्ट रिपोर्ट सरकारडे पाठवला जाईल. हा प्रोजेक्ट कोस्टल रोडला कनेक्टिविटी देईल. या दोन्ही अर्थात कोस्टल रोड आणि उत्तन ते विरार या नव्या लिंक रोडमुळे वर्सोवा ते विरार हा प्रवास केवळ ४५ मिनिटांत पूर्ण करणं शक्य होईल.
३ ठिकाणी कनेक्टरची सुविधा मिळणार
५५ किमी लांबीच्या मार्गावर ३ ठिकाणी कनेक्टरची सुविधा असणार आहे. वसई, विरार आणि उत्तनमध्ये हे कनेक्टर तयार केले जातील. त्याशिवाय ५५ किमीचा मार्गाचा पुढे आणखी विस्तार करण्याच्या योजनेवर एमएमआरडीए काम करत आहे. सरकार उत्तन ते विरारपर्यंत बनणाऱ्या मार्गाचा विस्तार पुढे पालघरपर्यंत करू इच्छित आहे.
वाहतूककोंडीपासून मिळणार सुटका
हा प्रोजेक्ट मुंबईला जोडण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. सध्या वसईवरुन मुंबईत येण्यासाठी वेस्टर्न एक्सप्रेय हायवे आणि लोकल ट्रेनची सुविधा आहे, ज्यामुळे या दोन्ही मार्गावर मोठी गर्दी होताना दिसते. मात्र या नव्या लिंक रोडमुळे नागरिकांना वाहतूककोंडीपासून दिलासा मिळेल.
उत्तन (भाईंदर) ते विरार हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएकडून दुसऱ्या फेजमध्ये विरार ते पालघर या मार्गावर लिंक रोड तयार केला जाईल.
कोस्टल रोड बांद्रा – वरळी सी लिंक, बांद्रा – वर्सोवा, वर्सोवा – दहिसर आणि दहिसर – भाईंदर या मार्गे उत्तन ते विरार असा कनेक्ट करेल. त्यानंतर पालघरपर्यंत बनणारा रस्ता एकमेकांना कनेक्ट करेल. या लिंकरोडमुळे रस्ते मार्गावरुन वाहतूक करणारे प्रवासी वाहतूककोंडीशिवाय मुंबई ते विरार आणि पालघरपर्यंत प्रवास करू शकतील.