146 people murdered in four districts in a year: २०२४च्या परिक्षेत्रामध्ये सर्व जिल्ह्यांच्या गुन्ह्यांचा आढावा मांडण्यात आला. यात चार परिक्षेत्रांमध्ये खुनाच्या प्रयत्नांचे ४२१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ४१९ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये दरोड्याचे ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
हायलाइट्स:
- चार जिल्ह्यांत वर्षभरात १४६ जणांचा खून
- बलात्काराच्या ५०६ घटना
- २१ कोटींचा मुद्देमाल परत
‘संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास दिलात तर घुसून मारू’; जरांगेंच्या वक्तव्यानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, म्हणाले…
२०२४च्या परिक्षेत्रामध्ये सर्व जिल्ह्यांच्या गुन्ह्यांचा आढावा मांडण्यात आला. यात चार परिक्षेत्रांमध्ये खुनाच्या प्रयत्नांचे ४२१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ४१९ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये दरोड्याचे ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. बलात्काराच्या ५०६ गुन्ह्यांपैकी ५०३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. चार परिक्षेत्रांमध्ये विनयभंगाचे एकूण १४५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी १४५४ गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत. याशिवाय या चार जिल्ह्यांमध्ये सरकारी नोकरांवर हल्ल्यांचे एकूण १८३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १८१ गुन्ह्यांच्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गंभीर गुन्ह्यांत तीन हजार जेलमुक्त आरोपींवर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आली.
शरीराविरुद्ध, मालाविरुद्ध वारंवार गंभीर गुन्हे करणारे व वाळू माफियांविरुद्ध ४६ आरोपींना एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध व ९८ आरोपींना तडीपार करण्याची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. वाळू माफियांवर ४४० केस करून १२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विनयकुमार राठोड, पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, पोलिस अधीक्षक नवनित कॉवत, धाराशिव पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी ही कारवाई केली.
Beed : ‘…तर खासदाराची चड्डीसुध्दा जागेवर राहणार नाही’; PSI मुंडेंच्या पोस्टने बीडमधील पोलीस दलात खळबळ
२१ कोटींचा मुद्देमाल परत
चार जिल्ह्यांमध्ये मालाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये ५० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात चार जिल्ह्यांत एकूण ५५ कोटी रुपयांची चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. या घटनांमध्ये पोलिसांनी २१ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल परत केला आहे. याशिवाय परिक्षेत्रामध्ये वेळोवेळी १५ हजार मुद्देमालाची रिकव्हरी करण्यात आली आहे.
तीन कोटी ३४ लाख ‘फ्रीज’
सायबर फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. चार पोलिस अधीक्षक कार्यालयांच्या वतीने अशा प्रकरणाचा तपास करून अर्जदारांचे तीन कोटी ३४ लाख रुपये ‘फ्रिज’ करण्यात आले आहेत. एक कोटी ५१ लाख रुपये अर्जदारांस परत करण्यात आले आहेत. याशिवाय वाहतूक शाखेकडून विशेष चेकिंग मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत दोन लाख दहा हजार केस दाखल करण्यात आल्या असून, २५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अवैध धंद्यांविरोधात कारवाई
विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार, विविध पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली. याअंतर्गत अवैध दारू, गावठी हातभट्टी चालवणाऱ्यांकडून नऊ कोटी रुपये, अवैध जुगार मटका कल्ब चालवणाऱ्यांकडून पाच कोटी, जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांकडून अडीच कोटी; तसेच अवैध गांजा, नशेच्या गोळ्या अंतर्गत एनडीपीएस करणाऱ्यांकडून सहा कोटी ५० लाख रुपयांचे ५० क्विंटल अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले.