• Wed. Mar 18th, 2026

    दिल्लीच्या राष्ट्रीय रक्षा महाविद्यालय शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 17, 2026
    दिल्लीच्या राष्ट्रीय रक्षा महाविद्यालय शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट – महासंवाद

    मुंबई, दि. १७: दिल्लीस्थित राष्ट्रीय रक्षा महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन येथे भेट घेतली. शिष्टमंडळात रशिया, ओमान, नायजेरिया, नेपाळ, इंडोनेशिया, टांझानिया या देशांमधील भूदल, नौदल आणि वायुदलातील सैन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिष्टमंडळाला महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली. तसेच महाराष्ट्राची वेगाने वाटचाल करणारी अर्थव्यवस्था, सक्षम सागरी सुरक्षा, संपर्क यंत्रणा, तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गुंतवणुकीची यशोगाथा सांगितली. याप्रसंगी संवादादरम्यान शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

    यावेळी शिष्टमंडळात मेजर जनरल (निवृत्त) हरकिरत सिंग, ब्रिगेडियर संजीव सहारण, अरविंद खेमटा, जे एस गिल, बीर विक्रम, नेपाळच्या लष्करातील कर्नल पदावरील अधिकारी मनोज थापा, रशियाचे अलेक्सी ग्रीशेव, इंडोनेशिया येथील फौजी नर्दिन, नायजेरियाचे स्टॅन्ली लुकपाटा ओकपुटू , टांझानिया येथील सादिकी एलियस मिहायो, ओमानचे हिलाल अब्दुल्ला हमीद अल महधोरी आदी उपस्थित होते.

    ०००

    निलेश तायडे/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *