• Wed. Jan 8th, 2025
    बायकोची माफी मागत रिक्षा चालकाने संपवले जीवन, अखेरच्या चिठ्ठीत ४ नावं, पिंपरी-चिंचवड हादरलं

    Pune Auto Driver Ends Life In Pimpri Chinchwad : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका रिक्षा चालकाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. आपल्या लेकीला सांभाळा अस म्हणत, बायकोची माफी मागत त्याने आयुष्याची अखेर केली.

    Lipi

    प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी चिंचवड : पिंपरी – चिंचवड शहरात आत्महत्या करण्यापूर्वी एका ऑटो रिक्षा चालक तरुणाने एक व्हिडियो तयार करून तो व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

    मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा, असं भावनिक आवाहन करत राजू नारायण राजभर या तरुणाने चिंचवड येथील साईनगर भागातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

    सावकरांचा जाच, कंटाळून तरुणाचं टोकाचं पाऊल

    रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, असा व्हिडिओ तयार करत आणि सुसाईड नोट लिहत राजू राजभर या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

    Pune Crime: बायकोची माफी मागत रिक्षा चालकाने संपवले जीवन, अखेरच्या चिठ्ठीत ४ नावं, पिंपरी-चिंचवड हादरलं

    इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळण्याचे आवाहन

    माझ्या छोट्या मुलीला सांभाळा, माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नसल्याने मला इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळा, असं अत्यंत भावनिक आवाहन देखील राजू राजभर या तरुणाने केलं आहे. आता या प्रकरणात निगडी पोलिसांत रजनी सिंग, राजीव कुमार, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे या चार आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने चिखली परिसरात शोककळा पसरली आहे. पुन्हा एकदा सावकारकीचा बळी गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

    दरम्यान, याआधीदेखील सावकाराच्या जाचाला कंटाळून एका ३९ वर्षीय तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. नंदुरबारमध्ये सतत अवैध सावकाराकडून व्याजाचे पैसे परत करण्यासाठी लावलेल्या तगाद्यामुळे त्याच्या जाचाला कंटाळून राज्य परिवहन विभागातील वाहकाने आयुष्याची दोर कापली. ३१ डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. नववर्षाच्या सुरुवातीलाच नंदुरबारमध्ये खळबळ उडाली असून याप्रकरणी तीन जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed