• Wed. Jan 8th, 2025
    पाच वर्ष थांबू शकत नाही; काँग्रेसचे माजी आमदार वेगळा निर्णय घेणार? जालन्यात राजकीय भूकंपाचे संकेत

    Kailas Gorantyal News: जालन्यात काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे पक्षांतर करणार असल्याचे संकेत आहेत.

    Lipi

    जालना: जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज अंबड रोड वरती मातोश्री लॉन्स या मंगल कार्यालयासमोर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. द्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल प्रामुख्याने उपस्थित होते.

    विशेष म्हणजे या कार्यक्रमांमध्ये जवळपास महाविकास आघाडीचे पाच ते सहा माजी आमदार होते. या कार्यक्रमांमध्ये चंद्रकांत दानवे यांनी आपण कसे पराभव झालो त्याचप्रमाणे कोणी कोणी रावसाहेब दानवे यांना मदत केली याचे किस्से सांगितले आणि कार्यक्रमांमध्ये एकच हास्य पिकले.

    त्यानंतर जालन्याचे माजी आमदार आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली या भाषणांमध्ये त्यांनी आपला पराभवाचे शैल्य बोलून दाखवले. जालना जिल्ह्यासाठी मी मेडिकल कॉलेज आणले आणि मला ३१ हजार मताने पराभवाचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे मी घाणेवाडीचे पाणी देखील जालना शहरासाठी उपलब्ध करून दिले माझा फायदा होण्याचे ऐवजी मला पराभव पत्करावा लागला. माझ्यासोबत काही विषारी साप आहेत, असं देखील त्यांनी बोलून दाखवले. हमारे अस्तीन मे कितने साप हैं और कब डस लेंगे किसमे कितना जहर है! ये हमे मालूम है क्यूकी यह साप हमने ही पाले है! त्यामुळे यांच्यावरती भरोसा ठेवू नका.

    यावेळेस कल्याण काळे यांना बोलताना त्यांनी सांगितले की तुम्ही काम करा परंतु एवढे काम करा की जेवढ्या लोकांच्या पचनी पडतील तेवढेच काम करा अन्यथा हे लोक विसरून जातील. मी ज्या-ज्या भागामध्ये काम केले, त्या भागामध्ये माझ्या विरोधात फतवे काढण्यात आले. मला खोटे बोलायला जमत नाही काही लोक बोलतात की मी तुला महापौर करून याला महापौर करेन, मात्र मी तसे केले नाही. मी जर तसे केले असते तर एका वार्डामध्ये दहा-दहा कार्यकर्ते मी जमा केले असते. परंतु मी प्रक्रिया वरती विश्वास ठेवतो मी असे खोटे आश्वासन देत नाही.

    आता येणाऱ्या काळामध्ये मी पाच वर्षे थांबू शकत नाही. त्यामुळे काही दिवसांमध्ये जालन्यांमध्ये मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचे संकेत देखील त्यांनी दिले. याकडे मात्र संपूर्ण जालन्यासह महाराष्ट्रातील लक्ष लागले आहे की, हा राजकीय भूकंप काय असणार, कैलास गोरंट्याल काँग्रेस सोडणार का? की ते काँग्रेस पक्षामध्ये कोणाला आणणार किंवा काही नगरसेवक पडणार, मात्र आता जालन्यामध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. नेमकं कैलास गोरंट्याल आता राजकीय काय भूमिका घेणार याकडे सगळेच लक्ष लागले आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed