सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना थेट ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. जालना येथील 18 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अधिकारी तात्काळ पोचले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचीमाहिती मिळतंय.
विद्यार्थ्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबद्दल शाळेचे शिक्षक प्रकाश बंसीधर मस्तीके यांनी सांगितले की, महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी तेलकट खाद्यपदार्थ खाल्ले. यासोबतच त्यांनी काही शीतपेय देखील पिले. यामुळे काही विद्यार्थ्यांना त्रास होत होता. यासोबतच थंड वारे येत असल्याने महाबळेश्वर ते पोलादपूर प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी खिडक्या बंद केल्याने विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला होता.
सरपंच संतोष देशमुखांना संपवण्याआधीची आरोपीची पोस्ट समोर, नाव खराब केल्याने… नेमकी काय?सध्या ग्रामीण रूग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शंतनू डोईफोडे, लहान मुलांचे डॉक्टर पुल्ले, डॉक्टर अनिल काकड, डॉक्टर गुठठे, डॉक्टर राजेश शिंदे रूग्णालयात दाखल झाले. पोलादपूर तहसील कार्यालयाचे अधिकारी यांनी देखील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. मध्यरात्री एक वाजेपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली.
विशाल भागवत शेळके वय 9 वर्ष, पायल कवन परिहार. वय 9, संकेत गजानन घुले. वय 9, प्रथमेश गणेश लाहोरकर. वय 15, शिवानी संजय डोंगरदिले.वय 15, आरती माधव कर्डेल. वय 15, समीक्षा सुनील वाकोडे. वय 15, योगिता कृष्णा शेळके.वय 15, आरुषी पुरुषोत्तम देवमाने. वय 13, वैष्णवी शेषराव घायवट. वय 16, ओम शंकर घायवट वय.14, शिवकन्या विजय बर्डे.वय 15, वनिता गजानन साळवे. वय 15, श्रावणी शालिग्राम देवमाने.वय15, तुषार समाधान कस्तुरे.वय 15, सोहम समाधान सोलाट. वय 15, ओम परसराम करडे वय.15 अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत.