Beed Crime: चार जिल्ह्यांत सर्वात ‘हॉट’ जिल्हा म्हणून बीडचा क्रमांक असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांत आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. यात सहकारी बँकांच्या दोन ते तीन घोटाळ्यांचा समावेश आहे. यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे मानले जाते. याशिवाय बीडमध्ये संघटित गुन्हेगारीचे प्रमाणही गेल्या काही काळात वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तीक्ष्ण हत्यार किंवा घातक शस्त्राने हल्ला करणे तसेच बालविवाहाची प्रकरणेही बीड जिल्ह्यामध्ये वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Beed Sarpanch Murder Case: या ‘आकां’ना धडा शिकवा
विविध गुन्ह्यांसह जमिनी बळकाविण्याची प्रकरणे पोलिसांत नोंद आहेत. या विविध गुन्ह्यांसह विविध कारणांमुळे खून किंवा खुनाचा प्रयत्न केल्याची नोंद झालेली प्रकरणे गेल्या काही वर्षांत वाढली आहेत. यामध्ये घरगुती कारणावरून हत्येपासून ते काही जणांकडून जुन्या वादातून निर्घृण हत्येच्या प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये बीड पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. यानंतरही जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. २०२४ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत ३६ खून झाल्याची पोलिस दफ्तरी नोंद आहे. याशिवाय बलात्काराच्या १५६ घटनांची नोंद करण्यात आली. तसेच दंगली घडविण्याचे ४९८ गुन्हे दाखल आहेत.
शुश्रूषा करण्यासाठी नेमलं पण केअरटेकरने केला घात; ८० वर्षीय वृद्धासोबत भयंकर कृत्य, हात-पाय दोरीने बांधले अन्…
पाच वर्षांतील आकडेवारी
वर्ष खून खुनाचा प्रयत्न
२०२० ५३ १५
२०२१ ६९ १३९
२०२२ ६० १२०
२०२३ ५४ १४२
२०२४ ३९ १७७
(जानेवारी ते नोव्हेंबरअखेर)
(स्त्रोत : महाराष्ट्र गृह विभाग संकेतस्थळ)