Santosh Deshmukh Case : बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. आता या हत्येचा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. यानंतर अंजली दमानिया यांनी मोठा खुलासा केलाय. यासोबत त्यांनी गंभीर आरोप केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला ताब्यात करण्यात आले. सुधीर सांगळे यालाही ताब्यात घेण्यात आले. आता याबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, खरंतर सुदर्शन घुले याला नंबर एकचा नाहीतर नंबर दोनचा आरोपी म्हणावे लागेल. कारण त्याच्यामागे जो सर्वात मोठा व्यक्ती होता तो कदाचित वाल्मिक कराडच होता, हे आता हळूहळू सिद्ध होतंय. सुदर्शन घुले याला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याचे स्वागत सर्वचजण करतील.
शरद पवार गटाच्या नेत्याचा सुरेश धस यांच्यावर खळबळजनक आरोप, आष्टीमधील बंगल्यावर…हे सर्व जवळपास एक महिन्यापासून कुठे लपले होते. हे सीआयडीला सापडत नव्हते, पोलिसांना सापडत नव्हते. आरोपींना कोण मदत करत होते, हे कोणाच्या संपर्कात होते आणि यांना कोण आर्थिक मदत करत होते, हे सर्व बाहेर येणे अत्यंत आवश्यक आहे. यांच्यावर कोणतीही माया न दाखवता सक्त कारवाई झाली पाहिजे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. यासोबतच अंजली दमानिया यांनी अजून एक गंभीर आरोप केलाय.
अंजली दमानिया यांनी म्हटले की, वाल्मिक कराड यांना लोक सर्रास भेटायला जात आहेत तर मग हे नेमके काय सुरू आहे. कुठेतरी यावर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तिथे लावली पाहिजेत. गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया या संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करताना दिसल्या. यासोबतच त्यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत. त्या सध्या बीडमध्येच आहेत.