Baramati Crime News : बारामतीमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांना पोलिसांनी गजाआड केलं असून त्यांची मध्यवर्ती येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. पोलिसांनी ठोस पावलं उचलच या चौघांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.
बारामती शहरातील ही पहिलीच कारवाई असून सदरचा प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव हा शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती कार्यालयास पाठवलेला होता.
Navi Mumbai : हेड कॉन्स्टेबलला संपवून बॉडी लोकलसमोर फेकली, मोटरमनने पाहिलं; नवी मुंबईत काय घडलं?
बारामती शहरामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या युवकांवर गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा इशारा बारामती पोलीस प्रशासनाने दिलेला होता. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली असून अप्पर पोलीस अधीक्षक बारामती तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयता हातात घेऊन मिरवणाऱ्या वरील आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून योग्य जामीनदार हजर करू न शकल्याने त्यांची येरवडा येथे रवानगी करण्यात आली आहे.
अवैध सावकाराचा पैशांसाठी तगादा, त्रासाला कंटाळून तरुणाचं टोकाचं पाऊल; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
यापुढे जागरूक नागरिकांनी अशा पद्धतीचे स्टेटस सोशल माध्यमावर ठेवलेल्या इसमांचे स्क्रीन शॉट घेऊन शक्ती नंबरवर किंवा प्रभारी अधिकारी यांना पाठवल्यास त्या आरोपींवर याच पद्धतीची कारवाई करण्यात येईल व बातमीदार यांचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.
बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणारे चौघे गजाआड, चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी
शक्ती नंबर – 9209394917
जागरूक पालकांनी, शिक्षकांनी, तसेच नागरिकांनी शहरातील चौका चौकात टवाळखोरी करणाऱ्या, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाडी करणाऱ्या, उघड्यावर मद्य प्राशन करणाऱ्या युवकांची माहिती व फोटो शक्ती नंबरवर पाठवावी त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल.