• Sun. Jan 5th, 2025
    दुकानासमोरच गाठलं अन् धाड धाड धाड… मिरारोडमध्ये अज्ञाताकडून तरुणाची गोळ्या झाडून हत्या

    Mira Road Man Shot Dead: मिरारोड येथे एका व्यक्तीवर अज्ञाताने गोळीबार करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने मिरारोड येथे दहशत पसरली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    भाविक पाटील, मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर मध्ये एका तरुणाची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.

    मिरारोड येथे नेमकं काय घडलं?

    मिरारोड रेल्वे स्थानकाला लागून शांती शॉपिंग सेंटर आहे. येथे ३५ वर्षीय शम्स तमरेज अन्सारी उर्फ सोनू यांचे चष्म्याचे दुकान आहे. ते शुक्रवारी (३ जानेवारी २०२५) रात्री दहा वाजता दुकाना बाहेर उभे होते. तेवढ्यात एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि तिने शम्स तमरेज अन्सारी यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यामध्ये गोळी लागल्याने शम्स तमरेज अन्सारी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    एका गुन्ह्यात साक्षीदार असल्याने हत्या झाल्याचा संशय

    या घटनेची माहिती मिळताच नयानगर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून घटनेचा पंचनामा केला जात आहे. एका गुन्ह्यात शम्स साक्षीदार असल्याने त्याला मागच्या काही दिवसांपासून धमक्याही येत होत्या, अशीही माहिती आहे. याच कारणास्तव त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

    ही हत्या नेमकी कुठल्या कारणामुळे झाली याचं खरं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती नयानगर पोलिसांकडून देण्यात आली.

    नागपुरात गोळ्या झाडून गुंडाची हत्या

    गुरुवारी नागपुरात एका गुंडावर गोळीबार करण्यत आला आहे. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. पवन धिरज हिरणवार (वय २६, रा. काचीपुरा) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो वडिलांना सतत त्रास देत असल्याच्या कारणावरुन आरोपीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली. या घटनेत आणखी दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. नागपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात या भयानक घटनेचा छडा लावला आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed