Walmik Karad: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमध्ये तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडनं त्याच्यासोबत २४ तास एखादी खासगी व्यक्ती असावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली.
‘मला स्लीप ऍप्नियाचा त्रास आहे. त्यामुळे खासगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा मिळावी. २४ तास सोबत एखादा मदतनीस देण्यात यावा. त्यासोबत सीपॅप मशीनदेखील मिळावी,’ अशा मागण्या कराडनं केज जिल्हा सत्र न्यायालयाकडे केल्या होत्या. पण न्यायालयानं त्या फेटाळल्या. तुरुंगात असलेल्या व्यक्तीसोबत खासगी व्यक्ती ठेवता येत नाही, असं न्यायालयानं सांगितलं. शासकीय व्यक्तीकडून सुविधा मिळेल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.
…तर देशमुखांची हत्या टळली असती! CID चौकशीतून घुले, आंधळेबद्दल धक्कादायक माहिती उघडकीस
स्लीप ऍप्निया म्हणजे काय?
‘स्लीप ऍप्निया हा एक झोपेचा आजार. यात व्यक्ती झोपेत असताना मानेचे स्नायू रिलॅक्स झाल्यावर वाढलेल्या वजनाचा फुफ्फुसावर दाब आला तर झोपलेल्या व्यक्तीचं श्वसन काही सेकंदांसाठी बंद पडतं. त्या कालावधीत व्यक्तीला जाग येऊ शकते. त्याची झोप डिस्टर्ब होऊ शकते. श्वसन व्यवस्थित न झाल्यानं, इतर अवयवांना रक्त पुरवठा न झाल्यानं त्याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो,’ अशी माहिती डॉ. आनंद काळे यांनी दिली.
Walmik Karad: कराड २२ दिवस कुठे होता? चौकशीतून महत्त्वाचा उलगडा; ठाकरेंच्या शिलेदाराचा दावा १००% खरा ठरला
विष्णू चाटेच्या कबुलीनं कराडचा पाय खोलात
बीडच्या केजमध्ये आवादा कंपनीकडून पवनचक्की प्रकल्पाची उभारणी सुरु आहे. त्या प्रकरणात कराडनं २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात त्याला अटक झालेली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या याच पवनचक्की प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या चाटेनं दिलेल्या कबुलीत कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संभाषण केल्याची माहिती दिली. सीआयडीनं याबद्दलचा अहवाल न्यायालयात सादर केलेला आहे. देशमुखांच्या हत्येनंतर विष्णू चाटे फरार झाला. त्याला पोलिसांनी काही दिवसांनी अटक केली.