• Sat. Jan 4th, 2025
    गुलाबरावांच्या चालकाने हॉर्न वाजवल्याने राडा, जळगावात नववर्षाच्या रात्री दोन गट भिडले

    Jalgaon Paldhi Violence: काल ३१ डिसेंबरच्या रात्री जळगावातील पाळधी गावातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी अन् कुटुंबियाला घेऊन एक कार चालली होती. यावेळी या गाडीच्या वाहनचालकाने हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले.

    हायलाइट्स:

    • पाळधी गावात रात्री दगडफेक आणि जाळपोळ
    • हॉर्न वाजवल्याच्या कारणातून राडा
    • जळगावात नववर्षाच्या रात्री दोन गट भिडले
    Lipi
    पाळधी गुलाबराव पाटील ड्रायव्हर शिवीगाळ

    निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात काल ३१ डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळची घटना घडली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या अन् कारचा कट लागल्याच्या कारणातून हा वाद उफाळला. यानंतर पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राडा घातला. यानंतर संतप्त जमावाने पाळधी गावात दगडफेक आणि जाळपोळ केली. या घटनेत १२ ते १५ दुकाने जाळली आहेत.या घटनेची मिळताच पोलीस पाळधी गावात दाखल झाले. तोपर्यंत जाळपोळ करणारे तरुण पळून गेले होते. पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला असून जाळपोळीला कारणीभूत असलेल्या तरुणांची धरपकड सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. घटनास्थळावरून आरोपी पळून गेल्याने परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
    Pune News : मटा इन्मॅक्ट! बारामतीत १८ ‘आजारी’ रूग्णवाहिकांवर कारवाई, नेमकं काय कारण?

    मिळालेल्या माहितीनुसार, काल ३१ डिसेंबरच्या रात्री जळगावातील पाळधी गावातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी अन् कुटुंबियाला घेऊन एक कार चालली होती. यावेळी या गाडीच्या वाहनचालकाने हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. यानंतर दोन गट आमने सामने आले आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सद्यस्थितीत पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच दगडफेक व जाळपोळ करणारे संशयित हे पसार झाले असून रात्री उशिरापर्यंत संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू होता.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed