गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यात आत्मसमर्पण केला. वाल्मिक कराडवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप आहेत. सीआयडीने तपास हाती घेतल्यानंतर कराडला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली. कराडने आत्मसमर्पण करण्यापूर्वी व्हिडीओद्वारे आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले.
वाल्मिक कराड यास १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश केजच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. व्ही. पावसकर यांनी दिले आहेत. न्यायालयासमोर सरकारी पक्षाकडून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे अराजकता निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. तर देशमुख यांच्या खून, ॲट्रॉसिटी आणि खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले फरार असून त्याला शोधण्यासाठी वाल्मिक कराडला पोलीस कोठडीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद मांडून १५ दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तर बचाव पक्षातर्फे आरोपी कराडला खंडणीच्या गुन्ह्यासाठी पीसीआरची आवश्यकता नसून कराड हा सामाजिक कार्यकर्ता असून ते स्वतःहून सीआयडीसमोर हजर झाले आहेत. म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून कराडला १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश केजच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. व्ही. पावसकर यांनी दिले आहेत. त्यानंतर त्यास सीआयडी बीडकडे घेऊन गेले.
दरम्यान, वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण करण्याआधी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये त्याने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचं म्हटलं आहे. अटकपूर्व जामीन होत असताना मी आत्मसमर्पण करत आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार असल्याचं वाल्मिक कराड याने म्हटलं आहे.