Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम31 Dec 2024, 9:55 pm
वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. त्यानंतर काही तासांनी पुण्यातून सीआयडीचे पथक केजकडे रवाना झाले होते. वाल्मिक कराडला केज रुग्णालयामध्ये तपासणीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर केज येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. कोर्ट परिसराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.