Mumbai New Year: नववर्षाचे बंदोबस्तात स्वागत, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी १५ हजार पोलिस तैनात
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी, अर्थात ३१ डिसेंबरला पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. आठ अपर पोलिस आयुक्त, २९ पोलिस उपायुक्त, ५३ सहायक पोलिस आयुक्त, दोन हजार १८४ पोलिस अधिकारी आणि १२ हजार ४८ पोलिस अंमलदार गस्तीवर असणार आहेत. राज्याचे गृह राज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.