Mumbai for New Year Police make Elaborate Arrangements: नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहाने नागरिक बाहेर पडतात. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, तसेच ठिकठिकाणच्या चौपाट्यांवर कुटुंबे मोठ्या प्रमाणावर जमतात. या सर्व पार्श्वभूमीवर ठेवण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्ताबाबत कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हायलाइट्स:
- नववर्षाचे बंदोबस्तात स्वागत
- नववर्षाच्या पूर्वसंध्येला चोख बंदोबस्त
- मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सुमारे १५ हजार पोलिस तैनात
विनोद कांबळीचे वाईट दिवस संपले, चालता येत नव्हतं तो आता नाचायला लागला, व्हिडिओ झाला व्हायरल
‘शहरातील महत्त्वांच्या चौकात नाकाबंदी असणार आहे. जगातील सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. ती प्रतिमा पोलिस कायम ठेवतील हा विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाला सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत. नववर्षाच्या सुरक्षेसाठी १२ हजार अंमलदार असतील, तर महिला पोलिसही तैनात आहेत’, असे कदम म्हणाले. ‘नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी कोणतेही दडपण बाळगू नये. पोलिस आपल्या सुरक्षेसाठी तयार आहेत’, असे आवाहन त्यांनी केले. ‘वाहतूक विभागाकडून गाडी चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.