Pune news : जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी निघालेला पिकअप आणि आयशर गाडीचा बेलसर – वाघापूर रस्त्यावर आज मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोमवती अमावस्ये करीता हजारो लोक खंडेरायाचं दर्शन घेतात. त्याकरीता दरवर्षी जेजुरीमध्ये मोठ्याप्रमाणे भाविकांचा मेळा भरतो. तसे वर्षभर जेजुरीमध्ये भाविक येतच असतात. परंतु सोमवती अमावस्येचे विशेष महत्त्व असल्याने खंडेरायाच्या दर्शनाची भाविकांना आस लागते. आपली हिच इच्छा पूर्ण होण्याआधीच हा अनर्थ घडला आहे.
महाराष्ट्रातील लाखो लोकांच श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला.
काय घडलं नेमकं?
जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी निघालेला पिकअप आणि आयशर गाडीचा बेलसर – वाघापूर रस्त्यावर आज मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जरेवाडी येथून सर्व भाविक जेजुरीला खंडोबा देवाच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र आज मध्यरात्री देवदर्शना पूर्वीच अडीच वाजता हा अपघात झाला.
या अपघातात पिकअप या गाडीतील जितेंद्र तोतरे, आशाबाई जरे या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर या अपघातात १० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.