नववर्षानिमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील रेस्टो-बार पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवणार आहेत. वाइन, बीअर व देशी दारूच्या दुकाने रात्री एक वाजेपर्यंत खुली राहतील. राज्य उत्पादन शुल्क विभाग तात्पुरता परवाना घेण्याचे महत्व सांगत आहे आणि मद्याची तस्करी थांबविण्यासाठी उपाययोजना करणार आहे.
नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी सांगीतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांत महापुरवठा करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घेणे आवश्यक आहे. परवाना न घेता मद्य पुरविल्यास कारवाई करण्यात येणार आहे या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे नववर्षाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमांचे ५० अर्ज आले होते. या सर्वांना परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी एका दिवसापुरतीच असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. परवाने न घेता सेलिवेशन करणाऱ्यांवर कारवाईचा दट्ट्या उगारण्यात येणार आहे.
मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री कायद्यानुसार गुन्हा आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित पार्टयांमध्ये पाट्यांमध्ये दारूचे सेवन केले जाते. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसाचा परवाना दिला जातो. त्यामुळे संबंधितांनी शुल्क भरून परवाना घ्यावा आणि संभाव्य कारवाई टाळावी, असं पुण्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी सांगितलं.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मिळून सुमारे तीन हजार मद्यालये आहेत. त्यामध्ये परमिट रूम, वाइन शॉपी, बीअर शॉपी यांचा समावेश आहे. सांगीतिक कार्यक्रमांत मद्यसेवन किंवा मद्यपुरवठा करण्यासाठी तात्पुरता परवाना दिला जातो. बनावट महा शहरात येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष पथके, विभागीय पथके जिल्ह्याच्या सीमांवर तैनात करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागतासाठी फार्म हाउस, इमारतीचे टेरेस किंवा अन्य मोकळ्या जागेत पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्यास, तेथे मद्यपानाची सुविधा उपलब्ध असल्यास उत्पादन शुल्क विभागाची परवानगी बंधनकारक आहे. या काळात मद्य तस्करांकडून अन्य राज्यांत उत्पादित आणि भेसळयुक्त मद्याची विक्री केली जाते. आतापर्यंत ३१४ ठिकाणी कारवाई करून ३८६ जणांना अटक करण्यात आली आहे. शिवाय २९ वाहनेही जप्त केली आहेत.