• Sat. Jan 4th, 2025
    जीवधन किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले, आनंदाचा क्षण दु:खात बुडाला; पुण्यातील तरुणासोबत आक्रित घडलं

    Pune engineering Student Fall From Jivdhan Fort : अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेल्या तरुणासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. जीवधन किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या तरुणासोबत अनर्थ घडला.

    Lipi

    प्रशांत श्रीमंदिलकर, जुन्नर, पुणे : सुट्टीचे दिवस असल्याने अनेक जण पर्यटनासाठी वेगवेगळ्या किल्ल्यावर फिरण्यासाठी येत असतात. अशाच एका किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या तरुणासोबत अनर्थ घडला आहे. जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनवर पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा किल्ल्यावरून तोल जाऊन खाली कोसळल्याने मृत्यू झाला आहे. पिंपरी येथील तरुण किल्ल्यावरुन पडल्यानंतर त्याच्या डोक्याला भयंकर मार लागला होता. अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विकी राठोड असं या तरुणाचं नाव असून तो पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील राहणारा आहे.
    Raigad News : आनंदाचा क्षण दु:खात बुडाला, पुण्यातील शिक्षकासोबत काशीद समुद्रावर अनर्थ घडला

    खडकाळ भागावरुन पाय घसरला आणि जीवाला मुकला

    वर्षाच्या अखेरीस अनेकजण सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरण्यासाठी निघतात. समुद्रकिनारे, गड-किल्ल्यावर नागरिक फिरण्यासाठी येतात. जुन्नर तालुक्यातील नाणेघाट परिसरामध्ये असणाऱ्या किल्ले जीवधन इथेही अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. शनिवारी सायंकाळच्या सुमारास विकी राठोड हा आपल्या मित्रांसोबत किल्ले जीवधन येथे पर्यटनासाठी आला होता. किल्ल्यावर असणाऱ्या कल्याण दरवाजा जवळील खडकाळ भागावरून विकीचा पाय घसरला. त्यामुळे तो खाली असलेल्या दगडांच्या ढिगार्‍यावर पडला. तो उंचावरुन जोरात पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
    Fact Check : वाघाला पकडून हत्तीवरुन परेड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या सत्य

    रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल

    घटनेची माहिती मिळताच शिवनेरी रेस्क्यू टीमचे सदस्य राजकुमार चव्हाण, मगदूम अली सय्यद, अनिकेत करवंदे तसेच वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह किल्ल्यावरून खाली आणला. विकी राठोड हा पिंपरी येथे राहत असून तळेगाव येथे अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. किल्ले जीवधनवर मागील वर्षी देखील अशीच एका घटना घडली होती.

    जीवधन किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले, आनंदाचा क्षण दु:खात बुडाला; पुण्यातील तरुणासोबत आक्रित घडलं

    पर्यटकांनी फिरायाला येताना काळजीपूर्वक यावे, कुठलाही धोका पत्करून आपला जीव धोक्यात घालू नये, जीव धोक्यात घालून सेल्फी काढू नये, अन्यथा आपला जीव गमावावा लागू शकतो. अनेक तरुन तरुणीचे ग्रुप किल्ल्यावर फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे किल्ल्यावर आल्यावर हुल्लडबाजी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed