• Wed. Jan 1st, 2025
    अजित पवारांचा 20 हजार मतांनी पराभव,  उत्तम जानकर यांचा मोठा दावा

    राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीतल्या अजित पवारांचा २० हजार मतांनी पराभव झाल्याचे मोठे विधान केले आहे. त्यांनी दिलेला अंदाज मतदारसंघातील गडबडींवर आधारित आहे. जानकरांनी निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी जय्यत तयारी केली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दीपक पडकर बारामती : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दीडशे मतदारसंघात गडबडी केल्या आहेत. बारामती मतदार संघामधूनही अजित पवारांचा 20 हजार मतांनी पराभव झाल्याचे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केले आहे. शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. उत्तम जानकर यांनी आज बारामतीतील गोविंद बाग या ठिकाणी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    पुढे बोलताना ते म्हणाले की, महायुतीचा जेवढ्या मतदारसंघात विजय झाला आहे. त्याची सखोल माहिती घेतल्यानंतर बारामती मतदारसंघातून अजित पवार ही 20 हजार मतांनी पराभव झाले आहेत. जवळ जवळ अजित पवारांना 1 लाख 80 हजार जी मत पडली आहेत. त्यापैकी दोनास एक असे असे प्रपोजल लावले होते. त्यामुळे युगेंद्र पवारांची मतं 80 हजार अधिक 60 ही 1 लाख 40 हजार आहेत आणि अजित पवारांमधील 60 हजार वजा होतात, असे जानकर म्हणाले.

    अजितदादांचे 12 आमदार राज्यात निवडून आले

    अजितदादांचे 12 आमदार राज्यात निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांचे 18, भारतीय जनता पार्टीचे 77 तर 3 अपक्ष असे मिळून त्यांचे 110 आमदार आहेत. असे असताना सखोल अभ्यास केल्यानंतर जयकुमार गोरे यांच्या बाबतीत एकास पाच प्रपोजल लावले आहे. गोरे यांना मते आहेत 1 लाख 48 हजार आणि घाडगे यांना 1 लाख 3 हजार मते आहेत. घाडगे यांची सुद्धा 30 हजार मते चोरली गेली. त्यामुळे घाडगे एक लाख 33 हजारावर येतात. आणि गोरे 1 लाख 21 हजारांवर येतात. अशा प्रकारे मी सर्व मतदारसंघातील तांत्रिक अंगाने अभ्यास करत असल्याचे जानकर म्हणाले.
    राष्ट्रवादीचे ‘चलो दिल्ली’; विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची यादी जाहीरचार महिन्यांच्या आत महायुतीचे सरकार जमीनदोस्त?

    दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुल गांधी आम्ही सगळे मिळून निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत. त्यांना या सर्व बाबी निदर्शनास आणून देणार आहोत. तसेच व्हीव्ही पॅड मधील चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. सरकारने राजीनामा दिला पाहिजे. ते देत नसतील तर मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेतली पाहिजे. तसेच चार महिन्यांच्या आत महायुतीचे सरकार जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळेल. त्या दृष्टीने व्यूहरचना आखली असल्याचेही जानकरांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *