महाराष्ट्र राज्यात महिन्याला शिक्षकांच्या वेतनासाठी 5 हजार 500 कोटींचा निधी लागतो.हा शिक्षकांचा निधी विधानसभा निवडणुकी अगोदर लाडक्या बहिणींना वितरित केल्याचा दावा करण्यात येतोय.राज्यातील शिक्षकांचा पगार रखडल्याने शिक्षिकांनी अतिशय संताप व्यक्त केला आहे.आम्ही लाडक्या बहिणी नसून दोडक्या बहिणी आहोत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं या शिक्षिका म्हणाल्या.आम्ही महिला शिक्षकांनी निवडणूकीत मेहनत घेतली,त्याची जाणीव सरकारला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षिकांनी व्यक्त केली.