• Sat. Jan 4th, 2025
    ‘हा वाद निर्माण झाला नसता तर…’ सुरेश धस-प्राजक्ता माळी वादात खासदाराची पहिली प्रतिक्रिया, कोणाची बाजू घेतली?

    Amol Kolhe : बीडमधील आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी संतोष देशमुख हत्येप्रकरणी भाष्य करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत मंत्री धनंजय मुंडेंना घेरले होते. यावर आता प्राजक्ता माळीनेही मुंबईत पत्रकार घेत सुरेश धसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जक्ता माळी आणि आमदार सुरेश धस यांच्यात वाद उफाळण्याची शक्यता असताना शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : बीडमधील आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी संतोष देशमुख हत्येप्रकरणी भाष्य करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत मंत्री धनंजय मुंडेंना घेरले होते. प्राजक्ता माळीसोबतच, सपना चौधरी आणि रश्मिका मंधाना या अभिनेत्रींचे नाव घेत सुऱेश धसांनी मुंडेंचा परळी पॅटर्न सांगितला होता. यावर आता प्राजक्ता माळीनेही मुंबईत पत्रकार घेत सुरेश धसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तिने धसांविरोधात महिला आयोगात तक्रार देखील केली आहे. तर करुणा मुंडेंनी याआधी प्राजक्ता माळीवर आरोप केल्याने त्यांनाही प्राजक्ताने नोटीस पाठवली आहे. ‘तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. पण त्यासाठी आम्हाला बदनाम का करता? तिकडे पुरुष कलाकारदेखील होते. मग नावं केवळ महिला कलाकारांचीच का घेतली जातात? अशा प्रश्नांची सरबत्तीच प्राजक्ताने धसांना केली. दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि आमदार सुरेश धस यांच्यात वाद उफाळण्याची शक्यता असताना शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अमोल कोल्हे म्हणाले, सुरेश धसांसंदर्भात वाद होईल असं वाटले नव्हते. हा वाद निर्माण झाला नसता तर बरं झालं असतं. सुरेश धस यांचं स्टेटमेंट हे इव्हेंटसंदर्भात होतें. त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नव्हती. सुरेश धस यांच्याकडून कोणावरही शिंतोडे उडवायचा प्रयत्न झालेला नाही. धस यांचं स्टेटमेंट हे सरळ आहे.
    गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे, शांत राहणं माझी हतबलता: प्राजक्ता माळी
    धनंजय मुंडेंवर शंका उपस्थित करत कोल्हे पुढे म्हणाले, ‘एखाद्या मंत्र्याबाबत वारंवार आरोप होत असेल तर संशयाला जागा निर्माण होणारी आहे. या संशयाचे धुके दूर करण्याचे काम मुख्यमंत्र्‍यांनी केले पाहिजे. सर्वसामान्य जनता जागी आहे हे आजच्या मूक मोर्चातून दिसून आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सापडायला एवढे दिवस लागत आहेत, याचा अर्थ कोणीतरी त्याला पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न यावेळी निर्माण होतो.’

    सुरेश धस यांच्या अभिनेत्रींवर केलेल्या वक्तव्याबाबत प्राजक्ता माळीने महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. तसेच ती यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे. तर कला क्षेत्रातील समस्त महिलांसाठी पाऊल उचलणार असल्याचेही प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत म्हटले आहे. ‘सुरेश धस यांनी माफी मागावी,’ अशी मोठी मागणी प्राजक्ताने केली आहे. परंतु धस यांनी ‘आपण कोणतीही आक्षेपार्ह बाब बोललेलो नाही, त्यामुळे मी माफी मागणार नसल्याचे’ माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. यामुळे आता नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed