अंबरनाथमध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.डॉक्टर बालाजी किणीकर हे आज लातूर येथे एका विवाह डोळ्याला उपस्थित राहिले होते. याच विवाह सोहळ्यात त्यांना संपवण्यासाठीचा कट रचण्यात आला होता.यातील सूत्रधार कोण आहेत त्यापर्यंत पोलीस नक्कीच पोहचतील असा विश्वास आहे.अशी प्रतिक्रिया बालाजी किणीकर यांनी लग्नसमारंभानंतर दिली आहे.