खरीप हंगामातील सोयाबीनच्या घटत्या दराने शेतकऱ्यांची घोर निराशा केली असताना आता तुरीच्या दरालाही उतरती कळा लागली आहे. महिन्याभरापूर्वी तुरीला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये दर होता त्यावेळेस सोयाबीनची भरपाई तुरीतून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र नवी तूर बाजारात दाखल होताच 7500 रुपयांवर दर आले आहेत त्यामुळे खरिपातील एकाही ठिकाणी शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली नाही.