Kalyan Crime : कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली असून, त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विशालची पत्नी साक्षीनेही या गुन्ह्यात साथ दिली होती, तिलाही पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याणच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली. आता पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. कल्याणच्या चक्कीनाका परिसरात 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर तिची हत्या केली. हैराण करणारे म्हणजे आरोपीच्या पत्नीने त्याची साथ या गुन्हात दिली.
Kalyan Crime : कल्याणची घटना गंभीर, विकृताला फाशी होईल हे निश्चित करा, फडणवीसांची पोलीस आयुक्तांशी चर्चाआरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षी गवळी ही बँकेत नोकरी करते. विशालने 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. यानंतर साक्षी ही घरी परतली. घरात तिने रक्त बघितले. यावेळी तिने घरात सांडलेले पूर्ण रक्त पुसून टाकले. हेच नाही तर रात्री विशालसोबत ती मृतदेह भरलेली बॅग घेऊन कब्रस्थानमध्ये पोहोचली. दोन्ही पती पत्नींनी ही बॅग तिथे फेकून दिली. यानंतर विशाल हा दादरहून थेट शेगावला निघाला.
सध्या एक सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी विशाल गवळी हा ओळख लपवण्यासाठी दाढी काढण्यासाठी दुकानात गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशालला शेगाव आणि त्याची पत्नी साक्षी हिला राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. आता दोघांनाही पोलिस कोठडीत पाठवण्यात आलंय. आरोपी अजून काही मोठे खुलासे करू शकतात. मात्र, या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये.