• Thu. Dec 26th, 2024
    रक्षकंच बनला भक्षक! चॉकलेटच्या बहाण्याने चिमुलकीसोबत अश्लील चाळे, लोणावळ्यात संताप

    mtonlineeditor | Contributed byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Dec 2024, 12:36 pm

    Pune News : कल्याण मध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारची घटना ताजी असताना पुण्यामधुनही एक धक्कादायक घटना समोर अली आहे. किल्ला विसपीरच्या पायथ्याजवळ मद्यपी पोलिसाने एका चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. तर हा प्रकार कोणाला सांगू नको म्हणत चॉकलेटचं आमिष दिलं. परंतु घडलेला प्रकार मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितला आणि पोलिसाचं बिंग फुटलं.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    आदित्य भवार,पुणे : कल्याण मध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारची घटना ताजी असताना पुण्यामधुनही एक धक्कादायक घटना समोर अली आहे. किल्ला विसपीरच्या पायथ्याजवळ मद्यपी पोलिसाने एका चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. तर हा प्रकार कोणाला सांगू नको म्हणत चॉकलेटचं आमिष दिलं. परंतु घडलेला प्रकार मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितला आणि पोलिसाचं बिंग फुटलं. या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात मद्यपी पोलिसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारी वरून लोणावळा पोलीस मद्यपी पोलिसाची चौकशी करित आहेत.

    सचिन सस्ते असं पोलिसाचं नाव आहे. विशेष बाब म्हणजे, आरोपी पोलिस लोणावळा पोलीस स्थानकात कार्यरत आहे आणि गुन्हा ही त्याच पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.

    घटनेची अधिक माहिती अशी आहे की, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकंच भक्षक बनला. एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता. याच नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केले. याप्रकरणी सचिन सस्ते ला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हा धक्कादायक प्रकार नाताळदिवशीच घडला. नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून भाकरी घेतली अन त्याने जेवण केलं. त्याच भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेंव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला सस्ते ने पाहिले. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला अन चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला अन या नराधम पोलीस सस्तेचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत आहे, त्याचं पोलिसांनी त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन त्याला अटक केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed