Authored byसूरज सकुंडे | Contributed byइरफान शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम23 Dec 2024, 8:24 pm
सोलापूरमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सव सुरु आहे. यंदाच्या कृषी महोत्सवात दूध पिणारा कोंबडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. राजा असं या कोंबड्याचं नाव असून तो तितकाच रुबाबदार आहे. एक वर्ष वयाचा आणि तब्बल सहा किलो वजनाचा हा कोंबडा पाहून सारेच चकित होतायत. कोंबड्यातील बॉडी बिल्डर शोभावा, अशी त्याची शरीरयष्टी… आता एवढी तगडी बॉडी बनवायची, तर खुराकही तसाच हवा ना? राजा कोंबड्याचा खुराकही एखाद्या बॉडीबिल्डरप्रमाणे आहे.आपल्या लाडक्या राजाबद्दल त्याचे मालक यशराज घाडगे यांनी खास माहिती दिलीये.