• Sat. Dec 28th, 2024
    पंकजा मुंडेंकडे महत्त्वाकांक्षी मंत्रालय; अदिती तटकरेंनीही खाते राखले, सरकारच्या लाडक्या बहिणींना कोणते खाते?

    Mahayuti Ministeries Allocation : महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. यामध्ये महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांनी वजनदार खाती आपल्याकडे राखली आहेत. तर सरकारच्या लाडक्या बहि‍णींना कोणती खाते हे जाणून घेऊया

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. यामध्ये महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांनी वजनदार खाती आपल्याकडे राखली आहेत. तर सरकारच्या लाडक्या बहि‍णींना कोणती खाते मिळणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. कोणत्या बहिणीला कोणते खाते हे आता जाणून घेऊया…

    1. पंकजा मुंडे – पर्यावरण व हवामान बदल आणि पशुपालन मंत्री
    2. अदिती तटकरे – महिला व बालविकास मंत्री
    3. माधुरी मिसाळ – नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री
    4. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री

    अखेर खातेवाटप जाहीर; फडणवीस, दादांकडे पॉवरफुल खाती; शिंदेंनी शक्तिशाली मंत्रालय खेचलं
    नव्या मंत्रिमंडळात महायुतीच्या तिन्ही प्रमुखांनी वजनदार खाती आपल्याकडे राखली. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपद कायम ठेवलं आहे. तर एकनाथ शिंदेंनीही नगरविकास खाते आपल्याकडेच राखले आहे आणि यासोबतच गृहनिर्माण खातेही मिळाले आहे. तर अजित पवारांनीही अर्थखात्याची धुरा स्वत:कडेच ठेवली याव्यतिरिक्त त्यांना राज्य उत्पादन शुल्क खातंही मिळालं आहे. यावेळी प्रमुखांना नेत्यांना वगळता अन्य सर्व मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल झाली आहे. यातच विधानपरिषदेच्या एकमेव मंत्री ठरलेल्या पंकजा मुंडेंच्या पारड्यात महत्त्वाकांक्षी असे पर्यावरण मंत्रालय पडले आहे. तर मंत्री अदिती तटकरे यांनी आपले आधीचे महिला व बालविकास खातो आपल्याकडे राखले आहे. मात्र यावेळी मंत्रिमंडळात केवळ चार महिलांना स्थान मिळाल्याने सत्ताधारी टीकेचे धनी ठरत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *