Mumbai News: मराठी कर्मचाऱ्याला त्रास देण्याचा आरोप असलेल्या एका बिहारी मॅनेजरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये घुसून समज दिली.
दक्षिण मुंबईतील एका कंपनीत एक मराठी कर्मचारी गेल्या १० वर्षांपासून काम करत आहे. गेल्या ६ महिन्यांपासून बिहारी मॅनेजर त्रास देत असल्याचा त्याचा आरोप आहे. ‘एक बिहारी सब भे भारी’ असं तो सातत्यानं मराठी कर्मचाऱ्याला सुनवायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून मराठी कर्मचाऱ्यानं कंपनीतील वरिष्ठांकडे त्याची तक्रार केली. तसं पत्र त्यानं वरिष्ठांना दिलं.
रिक्षा चालक महिलेला मारहाण, मनसैनिकांचा परप्रांतीय सुरक्षा रक्षकाला चोप; पाय धरायला लावले
मॅनेजरचा त्रास कमी होत नसल्यानं मराठी कर्मचाऱ्यानं थेट शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणं मांडलं. यानंतर विभागप्रमुख संतोष शिंदे शिवसैनिकांसह कार्यालयात शिरले. ‘एक बिहारी सब पे भारी है क्या.. अरे तू किती जणांवर भारी पडणार ते सांग आता,’ अशी विचारणा शिंदे यांनी बिहारी मॅनेजरला केली. त्यानंतर मॅनेजर काहीसा नरमला. कार्यालयातील अन्य काहींनी यामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर प्रकरण निवळलं.
मराठी कर्मचाऱ्याला त्रास देणाऱ्या बिहारी मॅनेजरला संतोष शिंदे यांनी जाब विचारला. ‘काय बोलला तू त्या पवारला? एक बिहारी सब पे भारी है क्या? किती जणांवर भारी पडणार रे तू? सांग मला.. तुझे कान चेक करु काय?’, असं म्हणत शिंदेंनी बिहारी मॅनेजरला दम भरला. त्याची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर बिहारी मॅनेजर लगेच नरमला.
Ajit Pawar: दोनपैकी एकच निवडा! भाजपची अजित पवारांना स्पष्ट सूचना; ‘जुना फॉर्म्युला’ लागू करण्यास नकार
मानसिक त्रास देणाऱ्या बिहारी मॅनेजरविरोधात मराठी कर्मचाऱ्यानं अद्याप तरी पोलीस तक्रार केलेली नाही. कंपनीच्या वरिष्ठांनी समज दिल्यानं, ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दम दिल्यानं मॅनेजरचा त्रास कमी होईल, अशी आशा कर्मचाऱ्याला आहे. तो त्रास कमी न झाल्यास पोलीस तक्रार करु अशी भूमिका कर्मचाऱ्यानं घेतली आहे.