देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी दिल्ली येथे निधन झाले. मनमोहन सिंग यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. अण्णा हजारेंनी यावेळी त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. देशाविषयी आस्था असणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्याने दुःख वाटले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.