Produced byकोमल आचरेकर | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम20 Dec 2024, 7:27 pm
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या परिवाराला भेट दिली. नांदेड परिक्षेत्र विभागाचे आयजी शहाजी उमाप यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन दिलं.मुख्यमंत्र्यांनी परभणीवर दिलेल्या निवेदनावर आम्ही सहमत नाहीत असं सुषमा अंधारे म्हणाल्या.मुख्यमंत्र्यांनी दिलेलं निवेदन आणि प्रत्यक्षात घडलेला घटनाक्रम यामध्ये तफावत आहे असं अंधारे म्हणाल्या.