• Sat. Dec 28th, 2024
    मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोरच दारु ढोसली, पालकांनी पोलिसांत धाव घेतली अन् तिकडे हेडमास्तरने आयुष्याची दोर कापली

    Nanded News: जिल्हा परिषद शाळेच्या एका मुख्याध्यापकाने वर्ग सुरु असताना विद्यार्थ्यांसमोर मद्यप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्याविरोधात पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने बदनामीच्या भीतीने शिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

    Lipi

    अर्जुन राठोड, नांदेड : जिल्हा परिषद शाळेच्या एका मुख्याध्यापकाने वर्ग सुरु असताना विद्यार्थ्यांसमोर मद्यप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ग्रामस्थांनी हा प्रकार उघडकीस आणून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने बदनामीच्या भीतीने शिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री लोहा तालुक्यात घडली. गोविंद ज्ञानोबा गायकवाड असे मयत शिक्षकाचे नाव आहे.

    वृत्तानुसार, गोविंद ज्ञानोबा गायकवाड वय ५० हे लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. बुधवारी सकाळी ते शाळेत आले. विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसमोरच मद्यप्राशन होते. हा प्रकार पाहून विद्यार्थी घाबरले आणि शाळेबाहेर आले. एका ग्रामस्थाने विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर का आले? याबद्दल विचारले असता हा प्रकार उघडकीस आला. काही वेळातच इतर ग्रामस्थ देखील शाळेत दाखल झाले आणि या प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली.
    नृत्य शिक्षकाचा अल्पवयीन मुलावर अत्याचार, समुपदेशनात सत्य समोर आलं अन् पोलिसांची मोठी कारवाई
    गटशिक्षणाधिकाऱ्याने या प्रकाराची दखल घेत तात्काळ तीन शिक्षकांना चौकशीसाठी शाळेत पाठवले. यावेळी मुख्याध्यापक गायकवाड हे दारूच्या नशेत आढळले. वर्गात एका थैलीमध्ये दारूची बॉटल आढळली. या साऱ्याचा पंचनामा तपासणीसाठी शिक्षकांनी केला. विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे जबाब त्यांनी नोंदवले. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही माहिती मिळताच मुख्याध्यापक गोविंद गायकवाड घरी गेले आणि त्याच रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती आहे.

    ग्रामस्थांकडून मोबाईलमध्ये चित्रीकरण

    दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक गोविंद गायकवाड हे शाळेत मद्य प्राशन केल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी शाळेत गर्दी केली. यातील काही जणांनी मुख्याध्यापकाचे चित्रीकरण केले. मुख्याध्यापक गायकवाड यांना नीट बोलताही येत नव्हते. सायंकाळी गायकवाड आपल्या घरी माळाकोळी येथे परतले. घरातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. बदनामी होईल या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. दरम्यान या घटनेने एकचं खळबळ उडाली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed