Ramdas Aathawale: ३९ मंत्र्यांचे नवे मंत्रिमंडळ असणार आहे ज्यामध्ये ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीचा आणखी एक घटक पक्ष असणाऱ्या आरपीआय पक्षाला एकही मंत्रिपद मिळालेले नाही. यावर आता रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
रामदास आठवले एएनआयशी संवाद साधताना म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार होणार असून आज नागपुराच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आयोजित केला. मुख्यमंत्री आणि उपमु्ख्यमंत्री हजर होते. पण आम्ही महायुतीचा भाग असून देखील आम्हाला साधं निमंत्रण देखील आलं नाही. विधानसभा निवडणुकीत आरपीआय आठवले गटाची कामगिरी चांगली राहिली. तर आमची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठकही झाली यावेळी त्यांनी आम्हाला एक तरी देणार असे वचन दिले होते. पण या मंत्रिमंडळात एकाही चेहऱ्याला संधी मिळाली नाही.
बळीराजासाठीची ‘ती’ विनंती दादांनी ऐकली अन् कोकाटेंच्या गळ्यात अखेर मंत्रिपदाची माळ; खास माणसाला दिला डच्चू
गेल्याच महिन्यात आठवलेंनी महायुतीच्या प्रमुखांकडे सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची इच्छा व्यक्त केली होती. महायुतीला दलितांचे मोठे मतदान मिळाले होते, असे सांगत त्यांनी इच्छा व्यक्त केली. ‘महायुतीला यावेळी दलितांची सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यामुळे मला वाटते की आरपीआयला मंत्रिपद मिळावे, आमच्या समाजाचीही तशी अपेक्षा आहे. आरपीआयला मंत्रिपद मिळाले तर महायुतीला याचा फायदाच होणार आहे.’ अशी भूमिका आठवलेंनी मांडली होती.