Authored byमानसी देवकर | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम14 Dec 2024, 8:18 pm
देशात पुन्हा एकदा संविधानाचा मुद्दा चर्चेत आला आहे. परभणीतील प्रकरणानंतर राजकारण देखील चांगलेच पेटले आहे. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी यासंदर्भात मोठे विधान केले आहे. जे संविधान मानत नाहीत, त्यांनी देश सोडून जावं, असे आठवले म्हणाले. परभणी दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.