• Fri. Dec 27th, 2024
    सरकारवर अंबादास दानवे यांची जोरदार टीका, म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नवीन सरकारवर टीका केली आहे. २० दिवस उलटून गेले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडी लढा सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. 23 तारीखपासून बहुमताने आलेले हे सरकार आहे, तब्बल 20 दिवस उलटून गेले तरी अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कोणत्याही खात्याचा कारभार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल होईल म्हणेपर्यंत आज 14 तारीख आली आता 15 ला होणार म्हणतात, खरं काय खोटं काय हे मोदी-शाहांना माहित. महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, एवढेच ठरलं आहे. पुढील धोरणात्मक निर्णय बैठकीत ठरतील, असेही दानवे यांनी म्हटले.

    हिवाळी अधिवेशनाबद्दल बोलताना अंबादास दानवे म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागा कमी आल्या असल्या तरी जनतेसाठी, महाराष्ट्र हितासाठी आमचा लढा सुरुच राहिल. या सरकारचे पूर्ण वाभाडे निघाले आहेत, जे काढायचे ते सभागृहात सांगू. हे दोन अडीज वर्षे सरकार होते ते शेतकरी विरोधी सरकार आहे. हे सरकार कशापद्धतीने आले, अजून जनतेलाच कळाले नाही अशा पद्धतीची स्थिती आहे.

    ज्या पद्धतीने बीडमध्ये एका सरपंचाचा खून झाला. यात सत्ताधारी पक्षाची लोकं सहभागी आहेत, अशी स्थिती आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या मामाचा खून झाला अशा अनेक घटना सरकार आल्यापासून या महाराष्ट्रात सुरु आहेत. सरकारचे मुख्यमंत्री दिल्लीला जाणे, मुंबईला येणे, नागपूरला जाणे एवढेच करतात बाकी या राज्यासाठी काहीही करत नाहीत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
    Raju Patil : मनसेचा माजी आमदार ‘सागर’ बंगल्यावर, देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, कारण इंटरेस्टिंगमागे जे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी होता तो सुरुवातीला सव्वा कोटी जनतेला मिळाला होता. लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आपोआप हे सरकार खाली आणणार आहे. लाडकी बहिणला 2100 रुपये देणार आणि शेतकऱ्याचा सातबारा पूर्ण कोरा करणार असे आश्वासन महायुतीने दिला होता त्याची पूर्तता करा, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. रामकृष्ण अडवाणी या देशाचे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची प्रकृती चांगली व्हावी ही प्रार्थना.

    80 वर्षे जुने मंदिर असेल तर त्याला धक्का लागता कामा नये ही शिवसेनेची भूमिका आहे. एकीकडे तुम्ही हिंदुत्व म्हणता आणि मंदिरावर हातोड्या मारण्याचे काम करता तर ते चुकीचे आहे, असे हनुमान मंदिराच्या प्रश्नावर दानवे म्हणाले. हे चुकीचे आहे, नियोजनच नव्हते तर तिथे शस्त्रक्रिया नव्हत्या केल्या पाहिजे, याची चौकशी करण्याची मागणी करु हिंगोली शासकीय रुग्णालय प्रकरणाबद्दल दानवे यांनी आपले मत मांडले.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed