Kurla Bus Crash: भरधाव बेस्ट बसनं दिलेल्या धडकेत कुर्ल्यात ७ जणांनी जीव गमावला, तर ४८ जण जखमी झाले. बस चालकाच्या चुकीमुळे ७ जणांचे जीव गेले. आरोपी चालक सध्या पोलीस कोठडीत आहे.
अवघी २० ते २५ सेकंद बेस्टची बस भरधाव वेगात धावली. पण या अर्ध्या मिनिटानं अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सुसाट वेगात पळणारी बस बुद्ध कॉलनीच्या कमानीला जाऊन धडकली आणि थांबली. तेव्हा तिकडे प्रदीप दिवे उभे होते. सोमवारी पाहिलेला थरार ते अजिबात विसरलेले नाहीत. कदाचित त्यांना तो आयुष्यभर लक्षात राहील. दिवे यांना बस धडकणार होती. पण ते अगदी थोडक्यात वाचले.
Kurla Bus Accident: बस मला चिरडणारच होती, तितक्यात…; ‘त्या’ २ सेकंदांमुळे अमन वाचला; अपघाताचा थरार सांगितला
‘ज्या भिंतीला धडकून बस थांबली, त्या भिंतीजवळच मी उभा होतो. भरधाव बस दिसताच मी सुरक्षित ठिकाणी पळालो. त्यामुळे माझा जीव वाचला. पण बस धडकत असताना शेजारच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका क्लिनिकमधून एक महिला बाहेर आली. ती महिला दुर्दैवी ठरली. तिची प्रकृती आता कशी आहे, त्याची मला कल्पना नाही,’ असं दिवे यांनी सांगितलं.
प्रदीप दिवे बस ज्या कमानीला धडकली, त्याच वसाहतीत राहतात. ‘तो भयानक प्रसंग मी विसरु शकत नाही. तो आताही मला जसाच्या तसा आठवतोय. त्या अपघाताचा नुसता विचार करुनही माझा थरकाप उडतो. समोरुन येणारी बस पाहून मी गारच पडलो होतो. त्यावेळी मी पटकन पळून बाजूला गेलो नसतो, तर काय झालं असतं, याचा विचार करुनच माझ्या अंगावर काटा येतो,’ अशा शब्दांत दिवेंनी त्यांनी पाहिलेला भयंकर प्रकार सांगितला.
Kurla Bus Accident: भेदरलेले प्रवासी, वेग वाढताच जीव मुठीत, काचा फुटताच उड्या, ‘त्या’ बसमधलं CCTV फुटेज समोर
बसचा चालक संजय मोरे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याची चौकशी सुरु आहे. भलीमोठी बस चालवण्याचा कोणताच अनुभव मोरेला नव्हता. त्याला अवघ्या ३ दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. पॉवर स्टेअरिंग असलेली वाहनं चालवण्याचा अनुभव मोरेच्या गाठिशी नव्हता. पण तरीही त्याला १२ मीटर लांबीची, पॉवर स्टेअरिंग असलेली इलेक्ट्रिक बस देण्यात आली आणि घात झाला.