Mumbai Tempreture: मुंबईतील सोमवारचे तापमान या ऋतूमधील सर्वांत कमी किमान तापमान नोंदले गेले. सोमवारचे सांताक्रूझचे किमान तापमान हे महाबळेश्वरच्या किमान तापमानापेक्षाही कमी होते.
हायलाइट्स:
- मुंबई, डहाणूत गारठा वाढला
- आणखी एक-दोन दिवस गारव्याचे
- पुन्हा किमान तापमान वाढण्याची शक्यता
Kirit Somaiya: मालेगावातील पैसा ‘व्होट जिहाद’साठीच; पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांचा आरोप
मंगळवारी मुंबईत १५ अंश सेल्सिअस किमान तापमान असू शकते. हे तापमान पुन्हा थोडे चढत जाईल. आठवड्याअखेरीस किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जाऊ शकते. सध्या पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव उर्वरित महाराष्ट्रावर कायम असल्याने मुंबईचे किमान तापमान सोमवारी महाबळेश्वरपेक्षाही कमी होते. दक्षिण कोकणात किमान तापमानात फारशी घसरण झालेली नव्हती. या दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रात हळुहळू थंडी अधिक जाणवेल, अशी माहिती निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
‘मविआ’मध्ये फूट? नार्वेकरांवर ‘उबाठा’चा पक्षपातीपणाचा आरोप; काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कौतुक
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणातही गारठा समुद्रसपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचीपासून ते साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत वरून खाली टप्प्याटप्प्याने सरकलेला, वेगवान पश्चिमी अतिथंड कोरड्या वाऱ्यांच्या झोताचा (जेट स्ट्रीम) पट्टा उत्तर भारताकडून दक्षिणेकडे, म्हणजे ३७ अंश उत्तरपासून ते पार १९ अंश उत्तर अक्षवृत्तापर्यंत रुंदावल्याने उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण येथे गारठा असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले. शिवाय अती उंचीवरील वाऱ्यांच्या झोताबरोबर समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीपर्यंत, पाकिस्तानकडून वायव्य दिशेने येऊन महाराष्ट्रात पश्चिमी दिशा घेणारे थंड कोरडे वारे वाहत आहेतत. त्यामुळे महाराष्ट्रात हळुहळू थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे, असे ते म्हणाले.