• Wed. Jan 1st, 2025
    Kirit Somaiya: मालेगावातील पैसा ‘व्होट जिहाद’साठीच; पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांचा आरोप

    Malegaon Vote Jihad: किरीट सोमय्या यांनी हे संपूर्ण प्रकरण ‘व्होट जिहाद’शी संबंधित असल्याचा दावा करीत हा घोटाळा १ हजार कोटींचा असल्याचा आरोप त्यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषदेत केला.

    महाराष्ट्र टाइम्स
    kirit somaiyae

    म.टा.वृत्तसेवा, मालेगाव: येथील नामको बँकेच्या शाखेतून बेरोजगार तरुणांच्या खात्याद्वारे १२५ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

    हे पैसे ‘व्होट जिहाद’साठीच वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर ईडी, सीबीआय, रिझर्व्ह बँक आदी ठिकाणी किरीट सोमय्या यांनी तक्रार देत चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणात ईडीने मालेगाव मुंबईसह सुरत, अहमदाबाद येथे छापे देखील टाकले होते. किरीट सोमय्या यांनी हे संपूर्ण प्रकरण ‘व्होट जिहाद’शी संबंधित असल्याचा दावा करीत हा घोटाळा १ हजार कोटींचा असल्याचा आरोप त्यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषदेत केला.
    ‘मविआ’मध्ये फूट? नार्वेकरांवर ‘उबाठा’चा पक्षपातीपणाचा आरोप; काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कौतुक
    किरीट सोमय्या सोमवारी (दि. ९) मालेगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ‘व्होट जिहाद’साठी आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करीत हा पैसा दहशतवादी संघटनेला देखील गेल्याचा संशय व्यक्त केला. या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असून, या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. येत्या ११ डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीस फसवणूक झालेल्या तरुणांची भेट देखील घेणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
    जगदीप धनखडांविरोधात अविश्वास प्रस्ताव? पक्षपातीपणाचा आरोप करीत ‘इंडिया’च्या हालचाली
    देशातील २१ राज्यांतील २०१ बँक खात्यांतून ही १ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला. या आर्थिक घोटाळ्यातील ६०० कोटी रुपये दुबईला गेल्याचा आरोप करीत विधानसभेच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’साठी यातील १०० कोटी रुपये रोख स्वरूपात वाटप झाले असून, त्याचे मुख्य केंद्र मालेगाव असल्याचा आरोपदेखील सोमय्या यांनी यावेळी केला.

    या आर्थिक घोटाळ्याचा मास्टर माईंड मेहमूद भगाड हा फरार आहे. यात एकूण २७ संशयित असून, यातील ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये मालेगावातील सिराज मोहम्मदसह मालेगाव नामको बँक शाखेतील दोघांचा समावेश आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *