वादग्रस्त वक्तव्यानंतर कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांनी माफी मागूनही जमावाकडून घरासमोर जाऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांत तक्रार नाही.
कीर्तनकाराने व्यक्त केली दिलगिरी
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या एका विधानामुळे झाली. चंद्रग्रहणासंदर्भातील एका व्हिडिओवर बोलताना त्यांच्याकडून काही वक्तव्ये झाली होती. हे विधान व्हायरल झाल्यानंतर वाडेकर यांनी तातडीने आपली भूमिका स्पष्ट केली. “माझा कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. वारकरी संप्रदाय हा सर्वांना एकत्र घेणारा आहे. तरीही माझ्या विधानामुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मी क्षमा मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो,” असा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला होता.
घरात घुसून अमानुष मारहाण
कीर्तनकाराने जाहीर माफी मागितलेली असतानाही, गांधेली येथील एका संतप्त जमावाने कायदा हातात घेतला. हा जमाव थेट वाडेकर यांच्या घरात घुसला आणि त्यांना बाहेर खेचून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी घरात त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि लहान मुलगी उपस्थित होते.
Imtiaz Jaleel : ‘चक्क मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे बनवले बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड अन् कास्ट सर्टिफिकेट’; जलील यांचा गंभीर आरोप
मारहाणीचा प्रकार इतका भीषण होता की, कुटुंबातील सदस्यही यात धक्काबुक्कीमुळे भयभीत झाले. या घटनेचा संपूर्ण थरार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, जमाव कशा प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे, हे फुटेजमध्ये दिसत आहे.
‘ते’ वक्तव्य काय होतं?
पोलीस तक्रार नाही
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी केली. धक्कादायक बाब म्हणजे, एवढी मोठी मारहाण होऊन आणि सीसीटीव्ही फुटेज समोर येऊनही अद्याप या प्रकरणात कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार दाखल झालेली नाही. दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने किंवा तक्रार देण्यास नकार दिल्याने अद्याप गुन्हा नोंदवला गेला नसल्याचे समजते. मात्र, अशा प्रकारे कायदा हातात घेण्याच्या प्रवृत्तीमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
