• Sun. Mar 15th, 2026

     यशवंतराव चव्हाण जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 12, 2026
     यशवंतराव चव्हाण जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. १२: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप पंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    याप्रसंगी पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलव दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच विधानमंडळ सचिवालयाचे सचिव -१ जितेंद्र भोळे, सचिव ३ डॉ. विलास आठवले, सचिव ४ शिवदर्शन साठ्ये आणि विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed