MLA Yogesh Tilekar Maternal Uncle Satish Wagh Murdered : भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण करुन नंतर त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांची अपहरणानंतर हत्या
पुण्यात सोमवारी मोठी घटना समोर आली. भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आल्याचं समोर आलं होतं. ९ डिसेंबर रोजी सोमवारी सतीश वाघ सोलापूर रस्त्यावरील हॉटेल ब्ल्यू बेरी समोर थांबले होते. त्यावेळी अचानक त्यांच्यासमोर एक चारचाकी गाडी येऊन थांबली. समोर थांबलेल्या चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून चार जण उतरले. त्यानंतर चौघांकडून सतीश वाघ यांना जबरदस्तीने त्या चारचाकी गाडीत बसवण्यात आलं होतं. ते मॉर्निंग वॉकला गेले असताना हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची माहिती आहे.
Pune Fire : फोटो फ्रेम स्टुडिओत अग्नितांडव, धुराचे लोट चार किमीपर्यंत… पुण्यात भीषण आग, नागरिक धुरात होरपळले
जबरदस्तीने कारमध्ये बसवलं, सोलापूरच्या दिशेने नेलं
सतीश वाघ यांचं अपहरण करुन गाडीत बसवून त्यांना घेऊन जाणारे चौघे जण होते. त्यानंतर सतीश वाघ यांचं अपहरण करणारी गाडी सोलापूर दिशेने गेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजमुळे त्यांचं अपहरण झाल्याची बाब समोर आली.
Solapur News : पुण्यातील कुख्यात गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी, माझा बाबा सिद्दिकी होण्याआधी…. माजी आमदाराची पोलिसांकडे मागणी
यवत गावाच्या हद्दीत आढळला मृतदेह
त्यानंतर त्यांच्या मुलाने तात्काळ आपल्या वडिलांचं अपहरण झाल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. अपहरण करणाऱ्यांनी सतीश वाघ यांना कारमधून सोलापूरच्या दिशेने घेऊन गेल्याचं त्यांच्या मुलाने पोलीस तक्रारीत सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू होता. अखेर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास सतीश वाघ यांच्या मृतदेह यवत गावाच्या हद्दीत आढळला असल्याची माहिती मिळाली. यानंतर आता अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या केल्याचं समोर आलं असून हत्या करण्यामागे आणि अपहरणाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.