• Wed. Jan 8th, 2025

    शहराच्या नामांतरानंतर मनपाचे बोधचिन्ह बदललं; पण नव्या चिन्हावर आक्षेप…निर्णय रद्दची मागणी, कारण काय?

    शहराच्या नामांतरानंतर मनपाचे बोधचिन्ह बदललं; पण नव्या चिन्हावर आक्षेप…निर्णय रद्दची मागणी, कारण काय?

    Ahilyanagar News : अहमदनगर शहराचं नामांतर अहिल्यानगर करण्यात आलं. त्यानंतर महानगरपालिकेचे नाव बदलून अहिल्यानगर महानगरपालिका केलं. आता मनपाचं बोधचिन्हही बदलण्यात आलं आहे. मात्र बोधचिन्ह रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

    Lipi

    विजयसिंह होलम, अहिल्यानगर : अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्यात आल्यानंतर आता महापालिकेने आपले बोधचिन्हही बदलण्याचे ठरवले आहे. २१ वर्षांपूर्वीच्या जुन्या बोधचिन्हाच्या जागी नवे बोधचिन्ह तयार करण्यात आले असून त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. प्रस्तावित नव्या बोधचिन्हात मध्यभागी किल्ल्याचे रेखाटन आणि त्यावर भगवा ध्वज आणि शिवमुद्रा आहे. तसेच किल्ल्याच्या प्रतिकृतीतील दरवाजात अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे.
    पाऊस, गारपीट, काय महागणार? मनुष्याला पीडा….बिरोबा यात्रेत आगामी वर्षाचं भाकित; सावधानतेचा इशारा देत म्हणाले…
    अहमदनगर महानगरपालिकेचे नाव बदलून अहिल्यानगर महानगरपालिका असे करण्यात आले असल्यामुळे या नावास समर्पक, आकर्षक आणि सुंदर बोधचिन्ह असावे, असे प्रशासनाने ठरवले. जुन्या बोधचिन्हाऐवजी नवीन बोधचिन्ह वापरण्यासाठी नागरिकांच्या हरकती आणि सूचना ११ डिसेंबरपर्यंत मागवण्यात आल्या. या नव्या बोधचिन्हात अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर असे वरच्या बाजूला वळणदार अक्षरात नमूद असून, त्याखाली मध्यभागी किल्ल्याचे रेखाटन आणि त्यावर भगवा ध्वज आणि शिवमुद्रा आहे. तसेच किल्ल्याच्या प्रतिकृतीतील दरवाजात अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे. तसेच किल्ला रेखाटनाच्या बाहेरच्या दोन्ही बाजूंना ढाल-तलवारीची चिन्हे आहेत आणि खालच्या बाजूला सरळ रेषेत विश्वास निरंतर जनसेवा तत्पर…असे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे.
    Satish Wagh Murder News: सतीश वाघ जीवाच्या आकांताने ओरडले ‘वाचवा वाचवा’ पण…; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपहरणाचा थरार
    ३० जून २००३ रोजी नगरला नगरपालिकेऐवजी महापालिका अस्तित्वात आली. त्यानंतर मनपाचे बोधचिन्ह तयार केले. मनपाने त्यासाठी स्पर्धाही घेतली होती. त्यातून अनेकांनी अनेकविध प्रकारचे लोगो पाठवले. त्यानंतर त्या काळातील ज्येष्ठ पत्रकार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले गेले व मनपाचा लोगो आकाराला आला. शहराचे नामांतर अहिल्यानगर झाले असल्याने मनपानेही आपले बोधचिन्ह बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मनपावर सध्या लोकनियुक्त पदाधिकार्‍यांचे राज्य नाही तर आयुक्त रुपातील प्रशासक आहे. त्यांच्या काळातच नामांतर आणि आता नवीन बोधचिन्ह तयार होत आहे.
    भररस्त्यात अचानक असं काही घडलं… दुचाकीस्वार कोसळला; भीषण घटनेत २२ वर्षीय तरुणाचा अंत

    शहराच्या नामांतरानंतर मनपाचे बोधचिन्ह बदललं; पण नव्या चिन्हावर आक्षेप…निर्णय रद्दची मागणी, कारण काय?

    मात्र, याला काही नागरिकांकडून विरोधही होत आहे. अभय ललवाणी यांना याला आक्षेप घेत म्हटले आहे की, प्रस्तावित बोधचिन्हपेक्षा सध्या अस्तित्वात असलेले बोधचिन्ह हे अतिशय ठळक आणि स्पष्ट असून त्यामध्ये फक्त नावाचा बदल करून तेच बोधचिन्ह वापरण्यात यावे. महानगरपालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता नवीन बोधचिन्ह तयार करण्यासाठीचा अनावश्यक खर्च टाळून नव्याने बोधचिन्ह तयार करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी अभय ललवाणी यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed