Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच सागर बंगला सत्ताकारणाचं केंद्र झाला होता. आता फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत आणि सागर बंगल्याला चांगलीच मागणी आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम बरेच महिने सागर बंगल्यावर होता. मलबार हिल परिसरात असलेला सागर बंगला कधीही फारसा चर्चेत राहिलेला नाही. कोणतेही मंत्री त्या बंगल्यासाठी आग्रही असल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं नव्हतं. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यानंतर मलबार हिलमधील रामटेक बंगल्याला कायमच मागणी राहिली आहे. या बंगल्यासमोर समुद्र आहे.
Devendra Fadnavis: फडणवीसांची अट; शिवसेनेच्या पाच जणांचा पत्ता कट? मंत्रिपद मिळणं अवघड, कोणाकोणाचा समावेश?
पेडर रोडवर असलेला रॉयलस्टोन, मलबार हिलवरील देवगिरी, अग्रदूत बंगल्यांना कायचम मागणी राहिली आहे. या सगळ्या बंगल्यांच्या तुलनेत सागर बंगला लहान आहे. त्यामुळे तो तसा कधीही फारसा चर्चेत राहिला नाही. मंत्री सागर बंगल्यासाठी प्रचंड आग्रही आहेत, असं याआधी कधीही घडलेलं नाही. पण आता वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सागर बंगल्याला मोठी मागणी आहे.
सागर बंगल्यातून वर्षावर गेलेले देवेंद्र फडणवीस हे दुसरे नेते ठरले आहेत. याआधी असा योगायोग अशोक चव्हाणांच्या बाबतीत घडला आहे. २००८ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. त्याआधी ते उद्योगमंत्री राहिले होते. सागर बंगल्यात त्यांचं वास्तव्य होतं. इथूनच ते वर्षावर राहण्यास गेले. ते दोनदा मुख्यमंत्री झाले. २००९ मध्ये पक्ष त्यांच्याच नेतृत्त्वात विधानसभा लढला. चव्हाण यांच्यापाठोपाठ सागरवरुन वर्षा गाठणारे फडणवीस दुसरे नेते आहेत.
Jayant Patil: सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता…; फडणवीसांना जयंत पाटलांचा मिश्किल टोला, सभागृहात खसखस पिकली
हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे सागर बंगल्यासाठी आग्रही आहे. मागील अडीच वर्षे ते वर्षा बंगल्यावर राहायला होते. आता तो बंगला त्यांनी सोडलेला आहे. आपल्याला सागर बंगला मिळावा यासाठी ते आग्रही असल्याचं कळतं. तसं घडल्यास फडणवीस आणि शिंदे यांच्यात पदांसोबतच बंगल्यांचीही अदलाबदल होईल.