Mahayuti Oath Taking Ceremony: धानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर अखेर १२ दिवसांनी राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झालं. आझाद मैदानात शपथविधी सोहळा संपन्न झाला.
चोरीला गेलेला मुद्देमाल १२.४ लाख रुपयांचा आहे. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये १३ जणांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. ‘अनेक जण आमच्याकडे चोरीच्या तक्रारी घेऊन गेले. त्यांच्या तक्रारींच्या आधारे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या अंतर्गत ३०३(२) च्या अंतर्गत आतापर्यंत १३ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
भाजप पुन्हा एकदा ‘शिंदे पॅटर्न’ राबवण्याच्या तयारीत; CMची खुर्ची धोक्यात, मित्रपक्ष भडकला
शपथविधी सोहळा दरम्यान काहींची सोन्याची चेन, पाकिट, पैसे चोरीला गेले. चोरट्यांचा, पाकिटमारांचा फटका बसलेल्या अनेकांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी नोंदवल्या. तक्रारींची संख्या वाढत आहे. आम्ही त्यांचा तपास करत आहोत. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटज तपासण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या कांदिवलीत राहणारे ६४ वर्षीय शिवाजी गवळी शपथविधी सोहळ्याला गेले होते. संध्याकाळी ६.३० वाजता गेट क्रमांक २ मधून ते बाहेर पडत असताना परिसरात बरीच गर्दी होती. तेव्हा त्यांची ३ तोळ्याची सोन्याची चेन चोरीला गेली. त्यांनी चेन शोधण्याचा बराच प्रयत्न केला. पण ती सापडली नाही. गवळी त्यांच्या मित्रांसोबत शपथविधी सोहळ्याला गेले होते.
Eknath Shinde: तेव्हा घोटाळा नव्हता? पवारांना उत्तर देताना शिंदेंनी आकडेवारीच मांडली; DCMकडे लांबलचक यादी
५० वर्षांच्या जयदेवी उपाध्याय यांचीही २ तोळ्याची सोन्याची चेन चोरीला गेली. तर फोर्ट परिसरात राहणाऱ्या ६१ वर्षीय संतोष लाचके यांच्या १.७ तोळ्याच्या सोन्याच्या चेनवर चोरट्यांनी डल्ला मारला. दादरला राहणाऱ्या ७० वर्षीय मोहन कामत यांच्यासोबतही असाच प्रकार घडला. त्यांची ३.५ तोळ्याची सोन्याची चेन चोरीला गेली. या सगळ्यांनी आझाद मैदान पोलिसात तक्रारी दिल्या आहेत.