Produced byविश्रांती शिंदे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम7 Dec 2024, 10:02 pm
रिसोड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अमित झनक हे सहपरिवार शपथविधीसाठी विधान भवनात दाखल झाले. मात्र विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार घातल्याने झनक यांना शपथ घेता आली नाही. अमित झनक त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगाही विधानभवनात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्या पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. अमित झनक चौथ्यांदा निवडून आले आहेत. हा अभिमानास्पद क्षण आहे. मी पहिल्यांदा शपथविधी पाहण्यासाठी आली असल्याची भावना त्यांच्या पत्नीने व्यक्त केली आहेत. तर अमित झनक म्हणाले, आम्ही शपथविधीसाठीच्या तयारीने आलो होतो. पण आजच्या ऐवजी उद्या शपथविधी होईल. ज्येष्ठ नेत्यांनी ठरवल्याप्रमाणे महाविकास आघाडीचा शपथविधी उद्या होईल. त्यांनी खास शपथविधीसाठी घातलेल्या जॅकेटबाबतही विधान केलं. यावेळी अमित झनक यांची अशोक चव्हाण यांच्याशी देखील चर्चा झाली. अमित झनक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पाचेंद्रकुमार टेंभरे यांनी….