• Thu. Jan 9th, 2025

    घराचे दोन आधार निखळले, ऑईल मिलच्या भीषण स्फोटात दोघा भावांचा मृत्यू, वडिलांची मृत्यूशी झुंज

    घराचे दोन आधार निखळले, ऑईल मिलच्या भीषण स्फोटात दोघा भावांचा मृत्यू, वडिलांची मृत्यूशी झुंज

    नांदेडच्या सिडको येथील तिरूमला ऑइल मिलमध्ये झालेल्या स्फोटात आणि आगीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. हर्षद आणि विनोद कोत्तावार हे दोघेही उपचारादरम्यान दगावले. त्यांचे वडील भास्कर कोत्तावार यांच्यासह इतर दोघे जखमी आहेत. घटनेची चौकशी सुरू आहे.

    Lipi

    अर्जुन जाधव ,नांदेड : सिडको येथील तिरूमला ऑइल मिलमध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीत जखमी झालेल्या दोन सख्ख्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर वडिलांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. १ डिसेंबर रोजी तिरूमला ऑइल मिलमध्ये ही घटना घडली होती. हर्षद कोत्तावार आणि विनोद कोत्तावार असं मयताचे नाव आहे. मुलाच्या मृत्यूने कोत्तावार कुटुंबियांवर दुःखाच डोंगर कोसळलं आहे. या घटनेची पंचक्रोषीमध्ये चर्चा सुरू असून एकाच घरातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    रविवार, १ डिसेंबर रोजी भास्कर कोत्तावार, हर्षद कोत्तावार, विनोद कोत्तावार यांच्या सह सुनील बंडेवार आणि सुधाकर बंडेवार हे मिल मध्ये काम करत होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास आँईल मिलमध्ये अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. आगीने रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मिलकडे धाव घेऊन अग्निशमन दलाला कळविले. अग्निशामक दलाच्या पथकांनी तीन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. पण या आगीच्या घटनेत पाच ही जण होरपळले गेले. त्यांना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उस्मानगर रस्त्याजवळ सिडको औद्योगिक वसाहतीत भास्कर कोत्तावार यांच्या मालकीचे तिरुमला आँईल मिल आहे.

    घटनेने दरम्यान टेप्पा क्र (एम.एच. २६ सी. एच. ०७००) हा जळून खाक झाला. दरम्यान घटनेत अति गंभीर असलेल्या दोघांना हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्देवाने हर्षद कोत्तावार याचा बुधवारी आणि विनोद कोत्तावार याचा गुरुवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. भास्कर कोत्तावार यांच्या सह इतर दोघांवर उपचार सुरु आहे. दोन्ही मुलाच्या पार्थिवावर एका पाठोपाठ अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान दोन्ही मुलांच्या निधनाने कोत्तावार कुटुंबियांवर दुःखाच डोंगर कोसळलं आहे. या घटनेनंतर सिडको हडको भागात शोककळा पसरली आहे. कोत्तावार कुटुंबियांना दोन मुलांच्या जाण्याने माणसिक धक्का बसला आहे. नेमका स्फोट कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed