Jalgaon Crime News: अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरुण पत्नी पूजासह वास्तव्याला होता. गुरुवारी ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार त्यांच्या ओळखीचा असलेला सागर चौधरी याच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले होते.
हायलाइट्स:
- अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले
- मारेकरी पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे
- जळगावमधील धक्कादायक घटना
Eknath Shinde : खरंच नाराज होते का एकनाथ शिंदे? फडणवीस म्हणाले, ते स्वभावाने भावूक आहेत, आमचे अजितदादा मात्र…
अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरुण पत्नी पूजासह वास्तव्याला होता. गुरुवारी ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार त्यांच्या ओळखीचा असलेला सागर चौधरी याच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले होते. त्यावेळी दोघांनी सोबत दारू पिली दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून करून प्रसार झाला होता.
तर दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत तुषार हे घरी पोहोचलेले नव्हते. दरम्यान, शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता तुषार यांचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला.
तुषार चौधरी यांच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला त्याच्या गावातून शिंदखेडा येथून अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून केल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे पोलिसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पुजा चौधरी हिला देखील ताब्यात घेतलं आहे.