• Fri. Dec 27th, 2024
    देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची अनोखी लव्ह स्टोरी

    देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून ते आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत . विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला लोकांनी प्रतिसाद दिला. निवडणुकीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकजण मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होते. शेवटी मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्याच गळात पडलीये.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जनतेचा पाठिंबा मिळाला. काल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. सुरूवातीला मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रस्सीखेच बघायला मिळाली. त्यानंतर स्पष्ट झाले की, मुख्यमंत्री भाजपाचाच होणार. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लाडकी बहिण योजनेचा फायदा महायुती सरकारला झाल्याचे सांगितले जातंय. महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींचे आभार देखील मानले.

    देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील कायमच चर्चेत असतात. अनेक कार्यक्रमांमध्ये त्या उपस्थित असतात. देवेंद्र आणि अमृता यांचे लग्न 2005 मध्ये झाले. नेत्रतज्ज्ञ शरद रानडे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ चारुलता रानडे यांच्या त्या कन्या आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची लव्हस्टोरी अत्यंत खास आहे. पहिल्याच भेटीमध्ये दोघे एकमेकांना बोलण्यात इतके जास्त मग्न झाले की, त्यांना वेळेचे भानच राहिले नाही.

    Devendra Fadnavis and Amrita Fadnavis

    लग्नासाठी दोघांची भेट एका मित्राच्या घरी झाली. मुळात म्हणजे या भेटीसाठी अमृता यांच्याकडे फार कमी वेळ होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 90 मिनिटांपेक्षा अधिक वेळ कसा निघून गेला हे अमृता यांना कळालेच नाही. अमृता यांचे सुरुवातीला राजकारणाबाबत थोडे वेगळे मत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर त्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. त्यांना देवेंद्र फडणवीस हे जमिनीसोबत जोडलेले व्यक्ती असल्याचे कळाले.

    एका मुलाखतीमध्ये बोलताना अमृता या म्हणाल्या होत्या की, मी देवेंद्र यांना भेटण्याच्या अगोदर दबावाखाली होते. देवेंद्र कसा माणूस असेल याचा मी विचार करत होते. माझ्या मनात राजकारण्यांची नकारात्मक प्रतिमा होती. पण देवेंद्र यांना भेटल्यानंतर सर्वकाही बदलून गेले. मला ते अतिशय प्रामाणिक व्यक्ती वाटले. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना अमृता यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते अजिबातच रोमांटिक नाहीत. ते सतत कामात व्यक्त असतात, त्यांच्यासोबत फार काही मजा आणि चांगला वेळ घालवायला जमत नाही.

    Devendra Fadnavis and Amrita Fadnavis

    अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र हे लग्नाच्या अगोदर किंवा लग्नाच्यानंतरही कधीच रोमांटिक झाले नाहीत. त्यांचे संपूर्ण जग राजकारणाच्याभोवतीच फिरते. एका मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस हे एकावेळेला 30 ते 35 पुरणपोळ्या खातात, असे थेट म्हटले होते. ज्यानंतर अनेक मिम्स् सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. अमृता यांच्या पुरणपोळ्यांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनाच स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed