• Sat. Dec 28th, 2024
    दांड्याने मारुन मारुन अपंग पतीचा जीव घेतला, मग निर्दयी पत्नीने फोन उचलला अन्…

    Solapur Wife Killed Husband: सालापुरात अपघातात अपंगत्व आलेल्या पतीला पत्नीने लाकडी दांड्याने मारहाण करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलंी

    Lipi

    सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी गावात दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात अपंग झालेल्या पतीला दंडुक्याचा प्रहार करत पत्नीने पतीला संपविले आहे.

    पंधरा वर्षांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीतील भांडण विकोपाला गेलं. त्यातून पत्नीनं डोक्यात जोरदार प्रहार केल्यानं पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. धुळप्पा नंदकुमार हेले (वय ३५, रा. तांदूळवाडी) असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी प्रगती धुळप्पा हेले हिने स्वतः पोलिसांना कॉल करत माहिती दिली आहे. ग्रामीण भागात घटना घडल्याने सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलिस नाईक आसिफ शेख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत धुळप्पा याची पत्नी प्रगती हेले याला ताब्यात घेतले आहे.

    तालुका पोलिसांनी पंचनामा करून रक्तबंबाळ अवस्थेत धुळप्पा हेले याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली असता धुळप्पा हेले याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक देशपांडे यांनी माहिती दिली.

    पत्नीनं केला पोलिसांना कॉल

    तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास घडला असावा. प्रत्यक्षात धुळप्पा याची पत्नी प्रगती हेले याने स्वतःहून १०० क्रमांवर डायल करून झाल्या घटनेची माहिती स्वतः पोलिसांना दिली. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवली सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्यासह त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शासकीय रुग्णालयात तपासणी करून धुळप्पाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

    लाकडी दंडुक्याने प्रहार केले

    मयत धुळप्पा हेले यांची आई नातेवाइकांचे लग्न असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावात गेली होती. गुरुवारी सकाळपासून धुळप्पा आणि पत्नी प्रगती हिचे भांडण सुरू होते. वाद टोकाला गेला अन् धुळप्पाच्या डोक्यात लाकडी दांड्याने जोराचा प्रहार करण्यात आला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत धुळप्पा घरामध्ये बेशुद्ध होऊन पडल्याचे चित्र पाहायला मिळाल्याचे मयताचा चुलत भाचा श्रीकांत बोरगावकर यांनी सांगितले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed